शिल्पाच्या वाढदिवसाला राजनं मागितली माफी!, raj kundra wish his lady love on birthday

शिल्पाच्या वाढदिवसाला राजनं मागितली माफी!

शिल्पाच्या वाढदिवसाला राजनं मागितली माफी!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा आज वाढदिवस... वाढदिवसाबद्दल तिचा पती आणि राजस्थान रॉयल्सचा सहमालक राज कुंद्रा यानं तिला शुभेच्छा दिल्यात. सोबतच त्यानं तिची माफिही मागितलीय.

गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांबद्दल राजनं शिल्पाची माफी मागितलीय. राज आणि शिल्पाचं नाव आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात समोर आलंय. ब्रिटिश नागरिक असलेल्या राज कुंद्रानं पोलिसांसमोर आपीएलच्या मॅचमध्ये आपण सट्टेबाजी केल्याची गोष्ट कबूल केल्यानंतर पोलीस सूत्रांकडून ही माहिती जाहीर झाली होती. याचबद्दल राजनं शिल्पाच्या ट्विटर पेजवर तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा तर दिल्याच पण झालेल्या त्रासाबद्दल माफिही मागितलीय.
राज ट्विटरवर म्हणतो, ‘माझ्या सुंदर पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा... त्या सर्व बाष्कळ गोष्टींसाठी मी तुझी माफि मागतोय, ज्यामुळे तुला गेल्या काही दिवसांपासून त्रास झालाय. सत्य समोर येईलच’. राज सट्टेबाजीत दोषी आढळल्यास त्याला राजस्थान रॉयल्स टीममधला आपले समभाग गमवायला लागू शकतात.

बीग बी अमिताभ बच्चन यांनीही शिल्पाला तिच्या वाढदिवसाला शुभेच्छा दिल्यात. याबद्दल राजनं महानायक अमिताभ बच्चन यांचेही आभार यावेळी मानलेत. ‘धन्यवाद! शिल्पाच्या वाढदिवसाला तुम्ही दिलेल्या शुभेच्छांमुळे तिला इतका आनंद झालाय जो दुसऱ्या कुणाच्याच संदेशामुळे झाला नव्हता. तिच्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे’, असा संदेश त्यानं बीग बींला पाठवलाय.

राजस्थान रॉयल्सचा बॅटसमन अजिंक्य राहणे यानंही शिल्पाला शुभेच्छा दिल्यात. त्यानं म्हटलंय, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. देव तुम्हाला, खूप सारा आनंद आणि प्रेम देओ’.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, June 8, 2013, 17:19


comments powered by Disqus