राजपाल यादव दहा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत, rajpal yadav in Judicial custody

राजपाल यादव दहा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत

राजपाल यादव दहा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

दिल्ली हायकोर्टानं बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव याला १० दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीय. राजपाल आणि त्याच्या पत्नीवर दाखल असलेल्या पाच करोड रुपयांच्या वसुलीसंदर्भातील याचिकेबाबत हा निर्णय दिलाय.

न्यायालयानं यादव याच्या पत्नीलाही न्यायालयाचं सत्र संपेपर्यंत न्यायालयीन अटक करण्याचे आदेश दिले. राजपाल आणि त्याच्या पत्नीविरोधात पाच करोड रुपयांच्या रिकव्हरीची केस दाखल करण्यात आली होती. ठरवून दिलेल्या वेळेपर्यंत राजपाल यादव पैसे परत देऊ शकला नाही. त्यामुळे त्याच्यावर खोटं बोलणं आणि खोटं अॅफिडेव्हिट देण्याचा आरोप लावण्यात आला.

‘अता-पता-लापता’ या सिनेमाच्या निर्मितीसाठी राजपालनं मुरली प्रोजेक्टस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून २०१० साली पाच करोड रुपयांचं कर्ज घेतलं होतं. परंतु, हे पैसे तो परत देण्यास असमर्थ ठरला. याअगोदर राजपालनं न्यायालयात हे पैसे व्याजासहीत परत करण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु, पैसे परत दिले नाहीत.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, December 3, 2013, 12:57


comments powered by Disqus