वर्माने केले कसाबच्या फाशीचे शुटिंग, Ram Gopal Varma feels weird shooting reel hanging of Kasab

वर्माने केले कसाबच्या फाशीचे शुटिंग

वर्माने केले कसाबच्या फाशीचे शुटिंग

www.24taas.com, मुंबई

चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मा याने मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर तयार केलेल्या `द अटॅक्स ऑफ 26/11` या चित्रपटासाठी कसाबच्या फाशीचे सीन शूट केला आहे.

आम्ही कसाबच्या फाशीचा सीन शूट केला आहे. निश्चित ही हैराण करणारी गोष्ट आहे की कसाबला फाशी दिल्यानंतर एका आठवड्यातच आम्ही या चित्रपटातील हे दृश्य शूट केले आहे, असे राम गोपाल वर्माने ट्विटरवर ट्विट केले आहे.

सध्या वर्मा या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारीत आहे.

या हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी अजमल आमिर कसाब याला अटक करण्यात आली होती. त्याला गेल्या २१ नोव्हेंबर रोजी फासावर लटकवण्यात आले. हा भागही त्याने आपल्या चित्रपटात चित्रित केला आहे.

या चित्रपटात प्रमुख भूमिकांमध्ये नाना पाटेकर आणि संजीव जयस्वाल मुख्य भूमिकेत आहे.

First Published: Sunday, December 2, 2012, 21:06


comments powered by Disqus