स्पेननंतर रनबीर-कतरिनाचे आता न्यूयार्कमध्ये रोमान्स, ranabira - katarina Romance in New York

स्पेननंतर रनबीर-कतरिनाचे आता न्यूयार्कमध्ये रोमान्स

स्पेननंतर रनबीर-कतरिनाचे आता न्यूयार्कमध्ये रोमान्स
www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई

बॉलिवूड अभिनेता रनबीर कपूर त्याची प्रेयसी कतरिना आता न्यूयार्कच्या सुट्टीवर आहे. रनबीरने न्यूयार्क दौऱ्याबाबत गुप्तता बाळगली होती. मात्र, रनबीरच्याच एका मित्राने त्याच्या या खासगी सुट्टीची छायाचित्रे पोस्ट केली आणि याची भांडाफोड झाली.

`बेशरम` रिलीज झाल्या नंतर रनबीरला काही दिवस विश्रांतीची आवश्यकता वाटली असल्याने तो सुट्टीवर गेल्याचे सांगण्यात येत आहे. रनबीर सोबत `यह जवानी है दिवानी` चित्रपटाचा दिग्दर्शक आयान मुखर्जी देखील असल्याचे सांगण्यात येत आहे. रनबीरने या दौऱ्याला गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मित्रामुळे त्याची माहिती मीडियापर्यंत सोशलनेटवर्किंगच्या माध्यमातून पोहोचली.

रनबीर, कतरिना आणि अयान तिघे ऑगस्टमध्ये स्पेनच्या लिबिझा येथे सुट्टीसाठी गेले होते. त्यावेळचे कतरिनाची बिकिनीवरची छायाचित्रे प्रसिध्द झाली होती. त्या नंतर मात्र, रनबीरला कतरिनाचे त्याच्या आयुष्यातील स्थान लपविता आले नाही. रनबीर `बिग अपल` या ठिकाणी मोठे घर विकत घेत चर्चाही बॉलिवूडमध्ये आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, October 10, 2013, 12:39


comments powered by Disqus