रणबीर-कतरिनाचं ओपन सिक्रेट..., ranbeer and katrina will come together

रणबीर-कतरिनाचं ओपन सिक्रेट...

रणबीर-कतरिनाचं ओपन सिक्रेट...
www.24taas.com,झी मीडिया,नवी दिल्ली

सध्या जोरदार चर्चेत असलेलं बॉलीवूडमधील कपल आता आपल्या प्रेमाची जाहीर कबुली देणार आहे, असं दिसतंय. गेल्या अनेक दिवसांपासून रणबीर आणि कतरिना या जोडप्यांबद्दल बॉलीवूडमध्ये जोरदार चर्चा होती. त्यांचं एकत्र फिरायला जाणं असो, कतरिनाच्या वाढदिवसाची पार्टी असो किंवा आणखी काही... सगळ्या ठिकाणी हे जोडप एकत्र दिसतं होत. त्यामुळे त्यांच्यात असलेल्या नातेसंबधांबद्दल लोकांमध्ये ही बऱ्याच प्रमाणात चर्चा चालू होती.

पहिल्यांदा दोघांनीही आपलं अफेअर नसून मैत्री असल्याचा दावा पहिल्यांदा केला होता. पण, आता मात्र या दोघांना त्यांचे प्रेमबंध लोकांच्या समोर उघडउघडपणे जाहीर करण्यास काहीच हरकत नाही, असं दिसतंय. लोकांनी त्यांना एका जोडप्याच्या रुपात बघण्यास या दोघांचीही काहीच हरकत नाहीय.

'लुटेरा'च्या स्पेशल स्क्रीनिंगच्या दरम्यान एकाच कारमध्ये रणबीर आणि कतरिना एकत्र बसल्याचे दिसून आले होते. काही दिवसांपूर्वी स्पेनमध्येही ही दोघं 'डेविड गुएटा' यांच्या स्पेशल कन्सर्टमध्ये दिसली होती.

२००९ मध्ये रणबीर आणि कतरिनाने 'अजब प्रेम की गजब कहानी'मध्ये पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट हिटही झाला होता. या चित्रपटानंतर या दोघांमधील संबधांबद्दल चर्चा होऊ लागली. परंतु त्यावेळी त्यांनी अशा प्रकारच्या कोणत्याही नातेसंबधाबद्दलच्या चर्चेला पुष्टी दिली नव्हती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, July 23, 2013, 14:38


comments powered by Disqus