रणबीर-कतरिना लग्नाची तारीख लवकर करणार जाहीर, Ranbir, Katrina may announce marriage date soon

रणबीर-कतरिना लग्नाची तारीख लवकर करणार जाहीर

रणबीर-कतरिना लग्नाची तारीख लवकर करणार जाहीर

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
रणबीर आणि कतरिनाच्या लग्नाची तारीख नक्की झाल्याची बातमी पुढे येत आहे. एका इंटरटेन्मेंट चॅनलने दिलेल्या बातमीनुसार रणबीर आणि कतरिना या वर्षाच्या शेवटी लग्न करणार आहे.

लग्नाची तारीख अजून फिक्स झालेली नाही. या चॅनलने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातमी चित्रपट जग्गा जासूसच्या शुटिंगला रणबीर आणि कतरिना दक्षिण आफ्रिकेला रवाना होणापूर्वी दोन्ही कुटुंब लग्नाची तारीख ठरविण्यासाठी भेटले होते.

दोघे सध्या ज्या पद्धतीने एकमेकांसोबत फिरतात आणि एकत्र राहतात त्यावरून स्पष्ट झाले आहे की, रणबीर आणि कतरिना आपल्या नात्याबाबत अधिकच गंभीर आहेत. रणबीर आपल्या आई-वडिलांचे घर सोडून लग्नापूर्वी कतरिनासोबत नव्या घरात राहणार असल्याची बातमी आहे.

रणबीरने आपल्यासाठी नवीन घर घेतले आहे पण तो कधी त्यात शिफ्ट होतो हे अजून नक्की झालेले नाही.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, June 5, 2014, 18:10


comments powered by Disqus