अशोक सराफ यांना रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार!, rangkarmi jivangaurav award to ashok saraf

अशोक सराफ यांना रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार!

अशोक सराफ यांना रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या बोरिवली शाखेतर्फे विविध रंगकर्मींचा खास गौरव करण्यात आला. अभिनेता अशोक सराफ यांना रंगकर्मी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

‘कलारजनी २०१३’ या अनोख्या उपक्रमाअंतर्गत अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या बोरिवली शाखेतर्फे विविध रंगकर्मींचा खास गौरव करण्यात आला. रंगभूमीवर तब्बल ४२ वर्षांची कारकिर्द गाजवणाऱ्या आणि आजही रंगमंचावर तितकाच उत्साही परफॉर्मन्स देणारे अभिनेता अशोक सराफ यांना टाळ्यांच्या गजरात जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

रंगभूमीवर यशाची नवनवी शिखरं पादाक्रांत करत असलेल्या अभिनेता प्रशांत दामले यांचाही मच्छिंद्र कांबळी अभिरंगराज पुरस्काराने खास गौरव करण्यात आला. शिवसेना आमदार विनोद घोसाळकर, गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत कादंबरी कदम, नंदेश उमप या कलाकारांसह, बाळ नाईक, विश्वास सोहोनी, यशवंत मडकईकर, चंद्रकांत मोरे, उमा दीक्षित, अशोक पावसकर आणि चित्रा पावसकर या पडद्यामागच्या रंगकर्मींचाही नाट्य परिषदेतर्फे खास गौरव करण्यात आला.

बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात रंगलेल्या या सोहळ्याला प्रेक्षकांसह अनेक कलाकारांनीही आवर्जून उपस्थिती लावली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, October 2, 2013, 12:33


comments powered by Disqus