Last Updated: Monday, October 15, 2012, 14:23
www.24taas.com, मुंबईअभिनेत्री राणी मुखर्जीच्या भावाला मुंबईत अटक करण्यात आलीये. एका मॉडेलने त्याच्याविरोधात वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीये. एका सिरियलच्या स्क्रीप्टबाबत गाडीमध्ये बसून चर्चा करू, असं सांगून राजाने छेडछाड केल्याचा आरोप या मॉडेलने केलाय.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजा मुखर्जी याला रविवारी रात्री ही अटक झाली. वर्सोवा पोलीस ठाण्यामध्ये ३५४ कलमाखाली त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अटक झाल्यानंतर राजाला अंधेरी कारागृहात पाठवण्यात आले. राजाने कारमध्ये माझ्याबरोबर छेडछाड केल्याचे, या अभिनेत्रीने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.
First Published: Monday, October 15, 2012, 11:45