राणी मुखर्जी १० फेब्रुवारीला करणार लग्न?, rani mukharjee & aditya chopra getting married on 10 feb?

राणी मुखर्जी १० फेब्रुवारीला करणार लग्न?

राणी मुखर्जी १० फेब्रुवारीला करणार लग्न?

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलिवूडची अभिनेत्री राणी मुखर्जी आणि सिनेनिर्माता आदित्य चोपडा येत्या १० फेब्रवारी रोजी विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे. बॉलिवूडच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उभयतांची लग्नाची तारीख आणि जागा पक्की झालीय. परंतु, यासंबंधी अजून जाहीररित्या ना राणीनं काही म्हटलंय ना आदित्यनं...

सूत्रांच्या माहितीनुसार, राणी आणि आदित्यचं लग्न जोधपूरच्या उमेद भवन पॅलेसमध्ये होणार आहे. लग्नाचा हा सोहळा फेब्रुवारीच्या पहिल्या दोन आठवड्यांपर्यंत सुरू राहणार असल्याचंही सांगण्यात येतंय. नीता अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त राणी मुखर्जी जेव्हा उमेद भवन पॅलेसमध्ये गेली होती तेव्हाच तिनं हेच स्थळ आपल्या विवाहासाठी निवडलं होतं.

आदित्य आणि राणी एकमेकांसोबत गेल्या अनेक दिवसांपासून संबंधात आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी साखरपुडा केल्याचीही चर्चा सुरू होती. राणी मुखर्जीनं एका कार्यक्रमात हिऱ्याची अंगठी घातलेली दिसली तेव्हापासून या चर्चेला सुरुवात झाली होती. तसंच आदित्यचे वडील यश चोपडा यांच्या निधनानंतर अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी रानी मुखर्जी हिला राणी चोपडा म्हणून हाक मारली होती, हे अजूनही अनेक जण विसरलेले नाहीत. सिन्हा यांनी आपण चुकून राणीला चोपडा संबोधल्याचं नंतर सांगितलं होतं.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, December 31, 2013, 11:32


comments powered by Disqus