Last Updated: Tuesday, December 10, 2013, 15:17
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईक्राईम ब्रॅन्चचे अधिकारी कशाप्रकारं काम करतात, ते कसे वावरतात, कुटुंब आणि काम यांचा ताळमेळ कसा घालतात, त्यांना कशाप्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं, त्यावर मात करून कामगिरी कशी फत्ते करतात हे सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न अभिनेत्री राणी मुखर्जी हिनं केला. यासाठी तिने चक्क मुंबई क्राईम बॅन्चचे सहपोलीस आयुक्त हिमांशू रॉय यांच्याकडंच धाव घेतली.
राणी मुखर्जी तिच्या आगामी ‘मर्दानी’ या चित्रपटात काम करीत आहे. या चित्रपटात ती क्राईम ब्रॅन्च अधिकार्याूच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळं पडद्यावर क्राईम बॅन्च अधिकार्या ची भूमिका बजावताना कुठंही कमी पडता कामा नये. हुबेहूब क्राईम ब्रॅन्च अधिकारी वाटलीच पाहिजे, यासाठी राणी मुखर्जी विशेष मेहनत घेत आहे.
आपल्या या भूमिकेसाठी ती क्राईम ब्रॅन्चचा अधिकारी कशाप्रकारे काम करतो. त्याची चालण्याची, बोलण्याची, वावरण्याची लकब कशी असते. कुटुंब आणि काम या दोन्ही बाजू अधिकारी कसा सांभाळतो, हे सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न राणी करीत आहे. यासाठी तिनं तब्बल एक तास हिमांशू रॉय यांच्याशी चर्चा केली.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, December 10, 2013, 14:50