रणवीर सिंह आणि दीपिका होणार पती-पत्नी Ranveer and Deepika is husband wife in upcoming film

रणवीर सिंह आणि दीपिका होणार पती-पत्नी

रणवीर सिंह आणि दीपिका होणार पती-पत्नी
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलीवूडमध्ये ज्यांच्या दोस्तीची चर्चा जोरदार आहे, प्रत्येक दिवशी एक ना एक बातमी रणवीर सिंह आणि दीपिका यांची जवळीक किती वाढलीय याच्यावर असते. रणवीर-दीपिकाची ही चर्चा आणखी रंगणार आहे.

आता दीपिका आणि रणवीस सिंह लवकरच पती-पत्नी होणार आहेत. मात्र ते एका सिनेमात पती-पत्नी होणार आहेत, रिअल लाईफमध्ये मात्र ते अजूनही जवळचेच मित्र आहेत.

होमी अदजानिया यांचा आगामी सिनेमा फाइंडिंग फेनी फर्नांडिस या चित्रपटात दीपिका काम करतेय, आणि यात रणवीर हा दीपिकाचा पती असणार आहे. मात्र रणवीरचा हा रोल फारच छोटा आहे.

रणवीर या चित्रपटात काम करणार आहे, हे ऐकून दीपिका एवढी खूश झाली की, दीपिकाने रणवीरला चित्रपटाचा ट्रेलर सोबत पाहण्याची विनंती केली.

काही न्यूज पेपर्सने दिलेल्या माहितीनुसार दीपिका लवकरच अमेरिकेत सुट्टी साजरी करणार आहे, रणवीरही दीपिका सोबत असणार आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 15, 2014, 12:57


comments powered by Disqus