Ranveer Singh flaunt his fab body in ‘Tattad Tattad`‘रामलीला’तल्या ‘तत्तड तत्तड’वर रणवीर थिरकला!

‘रामलीला’तल्या ‘तत्तड तत्तड’वर रणवीर थिरकला!

‘रामलीला’तल्या ‘तत्तड तत्तड’वर रणवीर थिरकला!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

निर्माता निर्देशक संजय भन्साळींचे चित्रपट हे ‘लार्जर दॅन लाईफ’ असतात. त्यांच्या चित्रपटांचे सेट्स नितांत सुंदर, वास्तवाच्या जवळ जाणारे आणि महागडे असतात म्हणूनच त्यांना आघाडीचे चित्रपट निर्माता म्हटलं जातं.
संजय भन्साळींचा आगामी प्रदर्शित होणारा ‘रामलीला’ हा चित्रपटही याच श्रेणीतील.

या चित्रपटाच्या विवादास्पद नावावरून बराच वादंग निर्माण झाला आहे. काही जणांच्या मते हे शीर्षक धार्मिक भावना दुखावणारं आहे. मात्र यासर्वांचा भन्साळींवर काहीही परिणाम नाही. भन्साळींनी या चित्रपटाचं एक गीत ‘तत्तड तत्तड ‘ लॉन्च केलंय.

उदित नारायणचा मुलगा आदित्य नारायण या गीताचा गायक आहे. ‘तत्तड तत्तड ‘मध्ये चित्रपटाचा नायक रणवीरच्या अनोख्या डान्स स्टेप्स पहायला मिळतात. तसंच रणवीर सिंग आपले सिक्स पॅक्ज दाखवतांना दिसतो. एकूणच देसी म्युझिक प्रेमींसाठी ‘तत्तड तत्तड ‘ पर्वणी आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Wednesday, September 25, 2013, 14:50


comments powered by Disqus