रणवीर सिंहला मिळाली त्याची ‘लकी डेट’, Ranveer Singh gets his luck date for Kill dil release

रणवीर सिंहला मिळाली त्याची ‘लकी डेट’

रणवीर सिंहला मिळाली त्याची ‘लकी डेट’
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अभिनेता रणवीर सिंग याची स्थिती ‘पांचो उंगलिया घी मै आणि सर कढाई मैं’ अशी झाली आहे. त्याचे चित्रपट हीट होत आहेत. तसेच त्याच्या वैयक्तीक जीवनात दीपिका पदुकोणसह त्याचे सुरू असलेले कुचीकू... तसेच यशराज कॅम्पमध्ये पुन्हा तो दाखल झाला आहे. यामुळे वर सांगितल्या प्रमाणे त्याची स्थिती झाली आहे.

सध्या त्याने किल दिल या चित्रपटाची शुटींग पूर्ण केलंय. चित्रपट ऑक्टोबरमध्ये रिलीज होणार होता पण त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली. नवी तारिख ऐकून रणवीर जाम खूश आहे.

रणवीर म्हणाला, १४ नोव्हेंबर ही माझी लकी डेट आहे. गेल्या वर्षी दीपिकासोबत माझी गोलियों की रासलीला – रामलीला रिलीज झाला होती. हा चित्रपट फिल्म समीक्षक आणि प्रेक्षकांना पसंत आली होती. मला आशा आहे तसेच यश ‘किल दिल’ला लाभेल.

याच चित्रपटात पहिल्यांदा परिणीती चोपडा ग्लॅमरस अवतारमध्ये दिसणार आहे. आतापर्यंत परिणीती ‘बबली’ भूमिका केल्या आहेत. रणवीरही नव्या गेटअपमध्ये दिसणार आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, June 2, 2014, 16:38


comments powered by Disqus