`LOVE` देऊन रणबीरनं दीपिकाला केलं प्रपोज!, ranveer singh proposed deepika padukone on IIFA

`LOVE` देऊन रणबीरनं दीपिकाला केलं प्रपोज!

`LOVE` देऊन रणबीरनं दीपिकाला केलं प्रपोज!

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंग हे दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र मानले जातात. पण, आता ‘आयफा’ पुरस्कारांच्या सोहळ्यात रणवीरनं आपल्या नात्याल मैत्रीपेक्षा पुढे जाऊन वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न केलाय.

‘आयफा’ सोहळ्यादरम्यान रणवीर सिंगनं दीपिकाला प्रपोज केल्याचं समजतंय... आणि आनंदाची गोष्ट म्हणजे रणवीरचा हा प्रस्ताव दीपिकानंदेखील स्वीकार केलाय.

रणवीर-दीपिकाला अनेक पार्टी आणि अनेक कार्यक्रमांत एकत्र पाहिलं गेलंय. पण, दोघांची मैत्री नेमकी कोणत्या टप्प्यावर येऊन पोहचलीय हे सांगणं मात्र अनेकांना कठिण होतं. रणबीर कपूरशी ब्रेकअप झाल्यानंतर नात्यालाच धास्तावलेली दीपिकाचं मन वळवण्यात रणवीर मात्र यशस्वी झालाय, असं म्हणावं लागेल.

मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघेही स्टार्स आयफा सोहळ्यासाठी यूएसमध्ये गेले होते. तेव्हा रणवीरनं एक सोन्याचं पेंडेंटसोबतच दीपिकाला प्रपोज केलं. या पेंडेंटवर इंग्रजीमध्ये ‘LOVE’ (प्रेम) असं लिहिलंय. हा पेंडेन्ट सध्या दीपिकाच्या नेहमी गळ्यात दिसतो.

रणवीर आणि दीपिका दोघंही सध्या करिअरमध्ये एका उंचीवर पोहचलेत. यशस्वी होण्याचा मंत्र त्यांना जणू कळू लागलाय. गोलियों की रासलीला राम-लीला, चेन्नई एक्सप्रेस, ये जवानी है दीवानी आणि रेस 2 या चार सिनेमांत दीपिका सुपरहिट ठरलीय. गेल्या दोन वर्षांपासून दीपिका आपली जादू सिल्व्हर स्क्रिनवर चालवतेय. रणवीरच्याही गोलियों की रासलीला राम-लीला आणि गुंडे या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर यश मिळवलं. रणवीर आणि दीपिकाच्या जोडीला प्रेक्षकांनीही चांगलंच उचलून धरलंय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, May 5, 2014, 17:54


comments powered by Disqus