Last Updated: Sunday, October 20, 2013, 12:31
www.24taas.com , झी मीडिया, मुंबईआपल्यातल्या वेगवेगळ्या टॅलेंटमुळं प्रियंका चोपडा नेहमीच चर्चेत असते. केवळ अॅक्टिंगच नाही तर आपण अनेकदा तिची मिमिक्री सुद्धा पाहिली आहे. पण आता प्रियंका गाणार आहे...
प्रियंका चोपडाला गाता येतं हे आपण अनेक रिअॅलिटी शोजमधून पाहिलंय. छोट्या पडद्यावर अनेकदा तिनं आपलं सिंगिंग टॅलेंट दाखवलंय. त्याला प्रेक्षकांनी पसंतीदेखील दिलीय. आता त्याचाच ती गंभीरपणे विचार करतेय. प्रियंका इतर हिरोईन्ससाठी प्ले बॅक सिंगिंगची तयारी करतेय.
प्रियांका म्हणते, "मला नेहमीच वेगळ्या गोष्टी करायला आवडतात. रिस्क घ्यायलाही आवडते. कदाचित मी अपयशी ठरेन; पण मी त्याची पर्वा करत नाही. गाण्याबाबत सांगायचं झालं तर हिरॉईन कोणी का असेना पण, मला जर एखादं गाणं आवडलं तर मी नक्की आवाज देईन. हा खूपच वेगळा अनुभव असेल.``
एकूणच काय आता हॉट अँड गॉर्जिअस प्रियंका आपल्याला गातांना दिसली तर नवल वाटायला नको...
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, October 20, 2013, 12:31