सल्लू आपला अधिकचा वेळ देतोय डेजी शाहला, Recently salman khan dating with jai ho heroine daisy shah

सल्लू आपला अधिकचा वेळ देतोय डेजी शाहला

सल्लू आपला अधिकचा वेळ देतोय डेजी शाहला
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सध्या सलमान खान आणि अभिनेत्री डेजी शाह यांची जोरदार चर्चा आहे. हे दोघे एकत्र फिरत असल्याने चर्चेत अधिक भर पडली आहे. `जय हो` चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले आहे. त्यातेव्हापासून दोघे एकत्र दिसत आहेत.

सलमान खानचा आगामी चित्रपट किक` चित्रपटच्या सेटवर डेजी नेहमी असते. मुख्य म्हणजे डेजीचा त्या चित्रपटाशी काहीही संबंध नाही. सूत्रांच्या माहितीनुसार डेजीचे सलमानच्या घरी जाणंही जास्त वाढलंय. मात्र, समलानच्या जवळचे सांगतात ही अफवा आहे आणि तसेही सल्लूच्या घरी पाहुणे येतच असतात.

तसंही, सल्लू मियांचं कुंटुब आपल्या घरी आलेल्यांचा पाहुणचार करण्यात हुशार आहे. कोणीही घरी आलं तरी त्याला जेवल्याशिवाय पाठवत नाहीत. काही दिवसांपूर्वी सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड लुलिया वान्तूरने एक पार्टी ठेवली होती त्यात तिने डेजी सोबत चुकीचं वर्तन केलं होतं, ही गोष्ट ही सलमान खानला आवडली नव्हती, बरं.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, June 12, 2014, 14:09


comments powered by Disqus