माधुरीची आणखी एक म्युझिकल ट्रीट?, remo dsuza wants to work with madhuri dixit

माधुरीची आणखी एक म्युझिकल ट्रीट?

माधुरीची आणखी एक म्युझिकल ट्रीट?
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

कोरिओग्राफरच्या भूमिकेतून डायरेक्टरच्या भूमिकेत शिरलेला रेमो डी’सूजा याला आता माधुरीला घेऊन एक सिनेमा बनवायचाय. व्ही. शांताराम यांच्या ‘नवरंग’ आणि ‘झनक झनक पायल बाजे’ या सिनेमांवर हा सिनेमा आधारित असेल.

‘मी सध्या एका सिनेमावर काम करतोय. हा सिनेमा मला माधुरीला सोबत घेऊन बनवायचाय. ‘नवरंग’ आणि ‘झनक झनक पायल बाजे’ या सिनेमांवर आधारीत ही म्युझिकल फिल्म असेल’, असं रेमोनं म्हटलंय. रेमो आणि माधुरी डान्स रिअलिटी शो ‘झलक दिखला जा’मध्ये गेल्या तीन सीझनमध्ये जजच्या रुपात एकत्र दिसत आहेत.

‘मी हा सिनेमा केवळ माधुरीसाठीच बनवतोय. या सिनेमाच्या कथेवर लवकरच कामाला सुरुवात करीन अशी आशा आहे. आणि हे माधुरीलाही माहित आहे की ज्यादिवशी मी स्क्रिप्ट पूर्ण करेल त्या दिवसापासूनच मी तिच्यासोबत औपचारिक रुपात याबद्दल बोलणार आहे. मला खात्री आहे की ती या प्रोजेक्टला नक्कीच होकार देईल.’

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, June 12, 2013, 14:53


comments powered by Disqus