Last Updated: Saturday, March 15, 2014, 17:50
www.zee24taas.com, झी मिडीया, मुंबई नुपूर अस्थाना निर्मित `बेवकुफिया` शुक्रवारी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झालाय. सध्याच्या परिस्थितीमध्ये नोकरी करणाऱ्या युवा प्रेमी येणाऱ्या अडचणीवर कशाप्रकारे मात करतात, हे आयुष्यमान खुराना आणि सोनम कपूर यांच्या केमेस्ट्रीमधून दाखवण्यात आलाय.
मोहित (आयुष्यमान खुराना) आणि मायरा (सोनम कपूर) यांनी नोकरी करणाऱ्या युवांवर आर्थिक मंदी, क्रेडिट कार्ड आणि पैसे यांचा होणारा परिणाम दाखवलाय. मोहितची कमाई ठिक-ठाक आहे. मात्र, आयएएएस अधिकारी असलेले मायराच्या वडीलांची (ऋषि कपूर) मात्र मोहितला पसंती नसते. त्यांना मायराचा विवाह एका करोडपती मुलाशी करुन द्यायची इच्छा आहे.
आर्थिक मंदीमुळे मोहितची नोकरी जाते. मोहित तीन महिने बेरोजगार होतो आणि त्याला पैशाची कमतरता भासते. बेरोजगार झालेल्या मोहितला दुसरी नोकरी शोधायला किती खटपट करावी लागते... याचा परिणाम दोघांच्या नातेसंबंधावर कसा होतो... आणि दोघांत निर्माण झालेला दुरावा... युवापिढीचे विचार आणि त्यांची लाइफस्टाईल हे सगळं चांगल्याप्रकारे पडद्यावर दाखवण्यात आलीय.
चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच सोनम कपूरची तिच्या बिकनी आणि किसिंगच्या दृश्यांवर चर्चा झालेली आहेच... पण, चित्रपट बऱ्याच ठिकाणी कंटाळवाणा आहे. सोनम कपूर आणि आयुष्यमान यांची केमेस्ट्री काही फारसा प्रभाव टाकू शकलेली नाही. एकदम टिपिकल प्रेम दाखवणारी `बेवकुफिया` एकदा पाहिला जाऊ शकतो.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, March 15, 2014, 13:43