Last Updated: Wednesday, October 17, 2012, 16:39
www.24taas.com, लंडनपॉप स्टार रिहानाने आपल्या स्वप्नातील साथीदाराची कल्पना जगासमोर मांली आहे. मला असा मजबूत साथीदार हवा की जो माझ्या जवळ येण्याचे धाडस करेल. डेटवर ज्याच्या सोबत जाऊ शकेल, अशा साथीदाराची मला अजूनही प्रतिक्षा असल्याचे रिहानाने एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
मला डेटवर जाणे आवडेल, मी एक तरूण आणि आकर्षक स्त्री आहे, आणि मला मजा करणे आवडते, असेही तीने या मुलाखतीत म्हटले आहे.
या संदर्भात मला कोणी अद्याप विचारले नाही. माझ्यावर विश्वास ठेवा, मी अशा पुरूषाच्या शोधात आहे, की जो माझ्या जवळ येऊ शकेल, असेही तीने यावेळी सांगितले.
दरम्यान रिहानाचा माजी मित्र क्रिस ब्राऊन याच्याशी ती लग्न करू इच्छिते. गेल्या दोन वर्षांपासून कोणाबरोबरही डेटवर नाही गेलेली २४ वर्षीय रिहानाने सांगितले की, मला अजूनही कोणत्या पुरूषाने डेटवर जाण्याबद्दल विचारले नाही.
First Published: Wednesday, October 17, 2012, 16:39