रोझलीन खानची छेडछाड, शिकवला धडा!, rozlyn khan registered complaint about Sexual molestation

रोझलीन खानची छेडछाड, शिकवला धडा!

रोझलीन खानची छेडछाड, शिकवला धडा!

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आपल्यासोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला मॉडेल रोझलीन खान हिनं चांगलाच धडा शिकवलाय.

मॉडेलिंग क्षेत्रात काम करणारी रोझलीन खान ही आपल्या बहिणीसोबत राहत असलेल्या इमारतीजवळून जात असताना ३६ वर्षीय कपिल अब्बास जाफरी यानं तिची छेड काढली. यावर रोजलिननं त्याला विरोध केला असता त्यानं अपशब्द वापरल्याचं रोझलीनचं म्हणणं आहे. यानंतर संतापलेल्या रोझलीन नं आणि तिच्या बहिणीनं जवळचं पोलीस स्टेशन गाठलं.

गोरेगाव पोलिसांनी कारवाई करत कपिल जाफरी याला ताब्यात घेतलंय. जाफरी याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी जाफरी हा रोझलीन राहत असलेल्या मिठानगर येथील शेफर्ड इमारतीत राहत असून, त्याचा प्रिंटिंगचा व्यवसाय आहे.

त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण जाधव यांनी सांगितलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, October 3, 2013, 11:45


comments powered by Disqus