२०० रुपयांत दिसा... शाहरुख आणि दीपिकासारखे, Rs. 200 look like shaharukh and deepika

२०० रुपयांत दिसा... शाहरुख आणि दीपिकासारखे

२०० रुपयांत दिसा... शाहरुख आणि दीपिकासारखे
www.24taas.com, उनेजा कुरेश, झी मीडिया, मुंबई
शाहरूख खान आणि दीपिका पदुकोणसारखी तुम्हाला तुमच्या गालावर खळी हवीय... तुम्हाला करिना कपूरसारखं सुंदर नाक हवंय...तुमचं हे स्वप्न सत्यात उतरु शकतं... आणि तेही केवळ दोनशे रुपयांत... हो...अगदी केवळ दोनशे रुपयांतच... कसं तर पहा हा रिपोर्ट....

शाहरुख खान... दीपिका पदुकोण आणि प्रीती झिंटा.... या सिनेतारकांच्या गालांवर पडणारी खळी असो किंवा सुंदर आखीव नाक... कॉस्मेटिक सर्जरी करून तुम्हीही आपला चेहरा सुंदर करू शकता आणि तोही केवळ 200 रुपयांत... या प्रकारची सुविधा मुंबईतलं जेजे या सरकारी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे... मुंबईत घाटकोपरमध्ये राहणा-या विजय पताडेंना ज्यावेळी दोनशे रुपयांत कॉस्मेटिक सर्जरीसंदर्भात माहिती मिळाली त्यावेळी त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता... कारण अशा सर्जरींसाठी पताडेंना खाजगी हॉस्पिटलमध्ये अव्वाच्या सव्वा रक्कम सांगितली होती... आता तीच सर्जरी अत्यल्प किंमतीत जेजे हॉस्पिटलमध्ये झाली...

विजयसारखेच अनेक जण अशी आहेत ज्यांना पैशांअभावी कॉस्मेटिक सर्जरी करता येत नाही... नाक, ओठ, गालांसह कृत्रिम खळीसाठी कॉस्मेटिक सर्जरी करण्यासाठी खाजगी हॉस्पिटल्समध्ये 15 हजारांपासून 1 लाखांपर्यंत रक्कम वसूल केली जाते आणि ही रक्कम सर्वसामान्यांना परवडत नाही. जेजे हॉस्पिटलनं गेल्या एक वर्षांपासून या प्रकारच्या सर्जरी केवळ दोनशे रुपयांत करून सर्वसामान्यांचं सिनेस्टारसारखं दिसण्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं... हॉस्पिटलमधून आकारले जाणारे दोनशे रुपयेही केवळ कागदपत्रांसाठी घेतले जातात... नाहीतर सर्जरी निशुल्कच केली जाते...

गेल्या वर्षभरात जेजे हॉस्पिटलमध्ये जवळपास 500 जणांनी स्वस्तातील कॉस्मेटिक सर्जरीचा फायदा घेतलाय... ज्यामध्ये 19 लोकांनी बोटोक्सची ट्रीटमेंट केली तर 50 हून अधिक तरुणांनी आपल्या गालांवर खळी तयार करून घेतली. तुम्हालाही सुंदर दिसायचं असेल तर आता हा सरकारी मार्गही उपलब्ध झालाय....



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, February 21, 2014, 12:38


comments powered by Disqus