लग्नानंतरचे राणीचे फोटो, राणी प्रेग्नेंट?rumour is bollywood actress rani mukherjee is pregnant so s

लग्नानंतरचे राणीचे फोटो, राणी प्रेग्नेंट?

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

राणी मुखर्जीचं लग्न breaking news ठरलं होतं, कारण तिनं चित्रपट निर्माता आदित्य चोप्रासोबत चुपके-चुपके लग्न केली. त्यांच्या लग्नाबद्दल बॉलिवूडलाही माहिती नव्हती. सर्वांनी असा विचार केला कि, राणीचं असं वागण्याचं कारण म्हणजे तिचा नवरा आदित्य खूप रिझर्व्ह आहे. तो आपलं खाजगी आयुष्य इतरांपुढे ठेवत नाही. मात्र राणी-आदित्यच्या अशा गुपचुप लग्नामागे काही तरी वेगळंच कारणं आहे.

नुकतीच राणी मुखर्जी तिची सासू पामेला चोप्रासोबत एका इव्हेंटला पोहोचली होती. नवविवाहित राणी वधूच्या वेशात खूपच सुंदर दिसत होती. सिंदूरच्या लाल रंगाचा तिनं अनारकली सलवार सूट घातला होता. मात्र राणी वारंवार आपली ओढणी पोटावर झाकत होती. तसंच आपल्या हातानं वाढलेलं पोटही लपवण्याचा प्रयत्न करत होती.
लग्नानंतरचे राणीचे फोटो, राणी प्रेग्नेंट?


सध्या राणीचं डबल चिन, लठ्ठपणा आणि चेहऱ्यावरची चमक वेगळाच काहीतरी इशारा करतेय. राणी मुखर्जीला असं करतांना करतांना पाहून तिची बहिण काजोलची आठवण झाली. जेव्हा काजोल पहिल्यांदा आई होणार होती, तेव्हा ती सुद्धा अशीच आपल्या ओढणीनं पोट झाकत लोकांमध्ये जायची. त्यामुळंच ही जोरदार चर्चा सुरू झालीय कि, राणी मुखर्जी प्रेग्नेंट आहे आणि म्हणूनच तिनं असं गुपचुप लग्न केलं आणि कोणालाच बोलावलंही नाही.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, June 1, 2014, 10:28


comments powered by Disqus