दिलीपकुमारांच्या आत्मचरित्राते प्रकाशन, `Sabastans and The Shadow` publication of the autobiography

दिलीपकुमार यांच्या `सबस्टन्स अँड द शॅडो`चे प्रकाशन

दिलीपकुमार यांच्या `सबस्टन्स अँड द शॅडो`चे प्रकाशन
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

दिलीप कुमार म्हणजे चित्रपटसृष्टीतील जिवंत दंतकथाच. आपल्या अदाकारीने कित्येक वर्षे रूपेरी पडदा गाजवणारे, दिग्गज सिने अभिनेते दिलीप कुमार यांच्या अधिकृत आत्मचरित्राचं प्रकाशन झालं.

`सबस्टन्स अँड द शॅडो` असं या आत्मचरित्राचं नाव आहे. आपल्या 91 वर्षांच्या जीवनप्रवासावर त्यांनी यात खास प्रकाशझोत टाकलाय. पत्नी सायरा बानू यांच्या आग्रहाखातर दिलीप कुमार यांनी आपली कहाणी पहिल्यांदाच पुस्तकरूपानं मांडलीय.

उदयतारा नायर यांनी लिहिलेल्या या आत्मचरित्राच्या प्रकाशनाच्या समारंभाला अवघं बॉलिवूड लोटलं होतं... कलिना येथील हॉटेल ग्रँड हयातमध्ये सोमवारी रात्री झालेल्या या सोहळ्यासाठी सुपरस्टार अमिताभ बच्चन, आमीर खान, माधुरी दीक्षित, प्रियंका चोपडा, धर्मेंद्र, वैजयंतीमाला, जावेद अख्तर, सलीम खान, सुभाष घई यांच्यासह बॉलिवूडचे अनेक सितारे अवतरले होते. या खास कार्यक्रमाचा मीडिया पार्टनस् झी २४ तास आहे.

दिलीप कुमार यांच्या `सबस्टन्स अँड द शॅडो` या पुस्तक प्रकाशनाच्या प्रसंगी त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. या वेळी दिलीपकुमारांच्या काही जुन्या मुलाखतींमधील अंश दाखवण्यात आले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, June 10, 2014, 08:12


comments powered by Disqus