Last Updated: Wednesday, January 23, 2013, 14:25
www.24taas.com,मुंबईक्रिकेटचा बादशहा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी अनोखी भेट दिली आणि सचिन भलताच खूश झाला. यावेळी आशाताईंनी सचिनचे खूप कौतुक केले.
मंगळवारी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते पंचतारांकित हॉटेलमध्ये आशा भोसले यांच्या सिनेमाच्या संगीताच्या ध्वनीफितीचे अनावरण झाले. या कार्यक्रमातच आशाताईंनी त्यांच्याकडे असणारे सचिनचे काही दुर्मिळ फोटो आणि आपल्या गाण्यांच्या सीडीही सचिनला भेट दिल्या.
कोट्यवधी सिनेरसिकांना आपल्या सुरेल आवाजाच्या तालावर डोलायला लावणाऱ्या आशा भोसले यांच्या अभिनय कौशल्याची झलक पाहण्याची संधी ‘माई’ या हिंदी सिनेमातून मिळणार आहे. या सिनेमाच्या संगीताच्या ध्वनीफितीचे अनावरण सचिनच्या हस्ते मुंबईत झाले.
First Published: Wednesday, January 23, 2013, 12:18