sai tamhankar in bikini

सई ताम्हणकर बिकीनीत...

सई ताम्हणकर बिकीनीत...
www.24taas.com, मुंबई

मराठीत आणि बिकिनी.... हो आता आपल्या मराठी चित्रपटातही बिकिनी दिसणार आहे. पुण्यात एका सोसायटीत हौदोस घालणारी मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर आता आपल्या बिकिनीत दिसणार आहे.

सई तिच्या आगामी चित्रपटात बिकिनीत दिसणार आहे. `नो एन्ट्री` या गाजलेल्या हिंदी चित्रपटाचा मराठी रिमेक असलेल्या `नो एन्ट्री पुढे धोका आहे` या चित्रपटात सईने बोल्ड अवतार धारण करत चक्क बिकिनी परिधान केली आहे.
`नो एन्ट्री पुढे धोका` आहे या चित्रपटात सईबरोबर भरत जाधव, क्रांती रेडकर, मनवा नाईक, अंकुश चौधरी, अनिकेत विश्वासराव यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.


मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये अल्पावधीतच सई लोकप्रिय अभिनेत्री ठरली आहे. मुळात बिनधास्त असलेल्या सईला जेव्हा निर्माता दिग्दर्शकांनी बिकिनी परिधान करण्याबद्दल विचारले, तेव्हा तिने ही गोष्ट मान्य केली आणि आपला बोल्ड अवतार या चित्रपटाच्या निमित्ताने दाखवला.

First Published: Friday, August 10, 2012, 14:21


comments powered by Disqus