Last Updated: Saturday, October 20, 2012, 17:30
www.24taas.com,मुंबई होणार होणार, असं कबुल करणारी जोडी करीना आणि सैफ. या दोघांचं लग्न झालचं. सिनेसृष्टीतील नवं जोडपं सैफिना लग्नानंतर पहिल्यांदा २७ ऑक्टोबरला पिपल चॉईस अॅवॉर्डस फंक्शनमध्ये एकत्र परफॉर्म करणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण छोट्या पडद्यावर करण्यात येणार आहेत.
माधुरी दीक्षित, परिणिती चोप्रा तसेच प्रियंका चोप्रा या देखील या कार्यक्रमात आपला जलवा दाखविणार आहेत. मात्र,कार्यक्रमाचा आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे बॉलिवूडमधील नविन विवाहीत जोडी सैफ-करिना आहेत. प्रियंका पिपल चॉईस अॅवॉर्डस ट्रॉफीचं उद्धाटन करणार आहे. प्रियंकाने असं म्हटलं कि “मी डान्स आयटम देखील करणार आहे. मला स्टेज वर डान्स करायला फार आवडते. मला आत्मविश्वास आहे की, हा कार्यक्रम फार छान होईल.”
नुकताच स्वतःचा इन माय सिटी’ अल्बम रिलीज केलेल्या प्रियांकाने अॅवॉर्ड फंक्शनमध्ये गाण्यास नकार दिला होता.तर पिपल चॉईस अॅवॉर्डस फंक्शनचं निवेदन ‘विकी डोनर्स’ चित्रपटाचा अभिनेता आयुष्यमान खुराना करणार आहे.
First Published: Saturday, October 20, 2012, 17:30