सैफ अली खानचे खरं नाव जगासमोर!, saif ali khan`s real name

सैफ अली खानचे खरं नाव जगासमोर!

सैफ अली खानचे खरं नाव जगासमोर!
www.24taas.com, मुंबई
शर्मिला टागोर यांच्या मुलाचे खरे नाव सैफ नसल्याचे अलीकडेच उघड झाले आहे. सैफचे खरे नाव साजिद अली खान असे आहे. सैफ आणि करीनाने वांद्रे विवाह नोंदणी कार्यालयात 12 सप्टेंबर रोजी लग्नाचा अर्ज दाखल केला होता.

यात सैफचे नाव साजिद अली खान असे नमूद करण्यात आले आहे. अखेर निकाहच्या निमित्ताने सैफचे खरे नाव त्याच्या चाहत्यांना कळले.

दरम्यान, आज सैफ अली खान आणि करीना कपूर विवाह बंधनात अडकलेआहेत. कपूर आणि खान कुटुंबांतील सदस्यांसह बॉलिवूड काही मोजके सेलिब्रिटी या लग्नाला उपस्थित होते.

वांद्र्यातील फॉर्च्युन हाईटस् या सैफच्या घरी हा लग्नसोहळा पार पडला. लग्न रजिस्टर पद्धतीनं करण्याचा निर्णय या दोघांनी घेतला. सैफ-करीनाच्या लग्नाची चर्चा बॉलिवूडमध्ये कित्येक दिवस होती आणि अखेर हे दोघे लग्नबंधनात अडकले. यावेळी करीना खास डिझाईन केलेले कपडे परिधान केले होते. करीना आणि करिष्माचा जवळचा मित्र म्हणून ओळखला जाणारा मनिष मल्होत्रानं दोघींसाठीही या खास दिवसासाठी खास कपडे डिझाईन केलेत. तर सैफचादेखिल नवाबी थाट लग्नात दिसून आला.

त्याअगोदर रविवारी करीनाच्या घरी एका संगीत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या संगीत सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रिटी सामील झाले होते. यावेळी सैफ अली खान याची पूर्व पत्नी अमृता सिंग हिनेदेखील या संगीत सोहळ्याला हजेरी लावल्याची चर्चा रंगली होती.

First Published: Tuesday, October 16, 2012, 20:01


comments powered by Disqus