Last Updated: Saturday, June 21, 2014, 19:59

www.24taas.com,झी मिडीया,मुंबई
माझी मुलगी परिणिताची चाहती आहे, असे अभिनेता, दिग्दर्शक सैफ अली खानने ही माहीती दिली. मुलगी सारा ही परिणीती चोप्राची खूप मोठी आहे. साराला सांगते, परिणिता सारखी दुसरी अभिनेत्री बॉलिवूडमध्ये नाहीच.
मध्यंतरी सारा चित्रपटात काम करणार, अशी चर्चा होती. मात्र, ही अफवा पसरली होती, असे सैफच एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. मी माझ्या मुलांना सारा आणि इब्राहिमला त्यांच्या आवडीला वाव दिला आहे. त्यांना ज्यात आवड असेल ते त्यांनी करावे. साराच्या बाबतीत मला माहित नाही की तिला चित्रपटात आवड आहे की नाही.
मी त्यांना कोणत्याही बंधनात बांधून ठेवलेले नाही. साराला थोडी फार चित्रपटाची आवड असली तरी ती सध्या अमेरिकेत पहिल्या वर्षात शिकत आहे. तिचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तिला वाटेल ती करु शकते, असे सैफने सांगितले.
माझ्या अंदाजे तिला सरकारी खात्यामध्ये काम करण्याची आवड आहे. त्यामुळे ती चित्रपटात येईल की नाही नक्की सांगू शकत नाही.
सारा आणि इब्राइम मुलं सैफच्या पहिली पत्नी अमृता सिंग हिची आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, June 21, 2014, 19:59