Last Updated: Tuesday, October 16, 2012, 20:03
www.24taas.com, मुंबईबॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेलं कपल म्हणजे `सैफिना` आज ते दोघंही लग्नाच्या बेडीत अडकले खरे.. मात्र संगीत कार्यक्रमात ते दोघंही एकमेकांशिवाय राहू शकले नाही. संगीत कार्यक्रमात दोघही चांगलेच अनावर झाल्याचे दिसून आले.
न राहवून दोघांनी किस करून आपला आनंद व्यक्त केला. त्यामुळे त्यांच्या या किसची चांगलीच चर्चा रंगली आहे. करीना कपूर आज मिसेस करीना सैफ अली खान झाली. रजिस्टार पद्धतीने सैफिना विवाहबंधनात अडकले.
या दोघांच्या लग्नाचे प्री वेडिंग फंक्शनचा एक भाग असलेला संगीत कार्यक्रम रविवारी पार पडला. सैफच्या मुंबईतील राहत्या घरी हा कार्यक्रम झाला. यावेळी सैफ करीना खूपच आनंदात होते. यावेळी या दोघांनी एकमेकांना किस केलं.
First Published: Tuesday, October 16, 2012, 19:51