Last Updated: Saturday, October 27, 2012, 18:15
www.24taas.com,मुंबईसैफ खानचं लग्न नुकतच झालं. या लग्नाची टेन्शन मात्र, श्रीदेवीला आलंय. तुम्ही म्हणाल, सैफ आणि करीनाचे लग्न जल्लोषात झालं. मग श्रीदेवीचं काय? हा प्रश्न पडलाय ना. त्याचं कारणही तसंच आहे. श्रीदेवीची मुलगीही आता मोठी झाली आहे. श्रीदेवीच्या मुलीच्या शुभेच्छा स्वीकारताना सैफनं तिला थ्यॅंक्यू बेटा, असं म्हटलं आणि श्रीदेवीला तेव्हापासून टेन्शन आलंय.
तुम्ही पण अगदी विचारात पडला असाल ना की, सैफ आणि करीनाच्या लग्नामुळे श्रीदेवीला एवढं कसलं आलयं टेन्शन? त्याचं असं झालंय, की श्रीदेवी आणि आपल्या दोन्ही मुलींना सैफीनाच्या लग्नसोहळ्यात घेऊन गेली होती. त्यावेळी श्रीदेवीच्या छोट्या मुलीनं सैफला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या त्यावर सैफ प्रेमानं तिच्या बघून थॅक्यू बेटा म्हटलं.
सैफनं ’थॅक्यू बेटा’ म्हटल्यावर श्रीदेवी घाबरली आणि शक्य तितक्या लवकर लग्नमंडपातून थेट बाहेर पडण्याचा मार्ग पत्करला. श्रीदेवीचं घाबरण्याचं कारण असं होतं की, १९९१ मध्ये सैफ आणि अमृता सिंगचं लग्न झालं तेव्हा सैफने करीनाला देखील ’थॅक्यू बेटा’ म्हटलं होतं. त्यावेळची बेटा आता सैफची बायको झालीय.
आता सैफच्या तोंडून ’थॅक्यू बेटा’ असं ऐकल्यानंतर श्रीदेवीला घाम फुटणे स्वाभाविकचं आहे ना!
First Published: Saturday, October 27, 2012, 18:15