सलमान बनतोय, बॉडिगार्डच्या मुलाचा गॉडफादर...., salman became godfather for his bodyguard`s son

सलमान बनतोय, बॉडिगार्डच्या मुलाचा गॉडफादर...

सलमान बनतोय, बॉडिगार्डच्या मुलाचा गॉडफादर...
www.24taas.com, मुंबई

सलमानच्या दिलदारपणाचा आत्तापर्यंत अनेकांना अनुभव आलाय. बॉलिवूडमध्ये तर त्याला ‘गॉडफादर’ म्हणूनही ओळखलं जातं... कारण, सलमाननं आत्तापर्यंत अनेक जणांच्या करिअरला एक आकार दिलाय आणि आता त्यात आणखी एका व्यक्तीचं नाव दाखल होणार आहे... ही व्यक्ती अगदी सामान्य आहे... अगदी तुमच्या-आमच्यातली म्हणावी अशी...

कतरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा यांनी बॉलिवूडमध्य आणण्याचं श्रेय सलमानकडेच जातं. यांशिवाय अशी कित्येक नावं आहेत ज्यांना सलमानमुळे बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला आणि त्यानंतर ते तिथं चांगलेच स्थाईक झाले. आता मात्र, सलमान एका नवीन चेहऱ्याला सर्वांसमोर आणणार आहे... ही व्यक्ती आहे सलमान खानचा बॉडीगार्ड ‘शेरा’ याचा मुलगा... आपल्या आगामी सिनेमात शेराच्या मुलाला सलमान लॉन्च करणार आहे... त्याचं कारण म्हणजे सलमान शेराच्या या मुलाच्या पर्सनॅलिटीवर अगदी फिदा आहे...

एका वर्तमानपत्राशी बोलताना खुद्द सलमाननंच हा खुलासा केलाय. ‘शेराच्या मुलाचा लूक आणि पर्सनॅलिटी खूपच दमदार आहे. वयाच्या विसाव्या वर्षीही तो आपल्या कामाकडे खूप जबाबदारीनं पाहतो... आणि हे नक्कीच कौतुकास्पद आहे. त्याच्या पर्सनॅलिटीमुळेच तो मोठ्या पडद्यावर चांगलंच नाव कमावू शकेल... एक अभिनेता बनण्याचे सर्व गुण त्याच्यापाशी आहेत’ असं सलमाननं म्हटलंय.

यापूर्वीही दिग्दर्शक बोनी कपूर यांचा मुलगा अर्जुन कपूर यानं स्वत: आपल्या बॉलिवूड पदार्पणाचं श्रेय सलमानला दिलं होतं.

First Published: Wednesday, February 13, 2013, 12:59


comments powered by Disqus