सलमान रजनीकांतपेक्षा वरचढ, एका फिल्मचे घेणार १०० कोटी, Salman charges 100 crores per movie

सलमान घेणार एका फिल्मचे घेणार १०० कोटी

सलमान घेणार एका फिल्मचे घेणार १०० कोटी

www.24taas.com, मुंबई

‘दबंग’ सलमान खान आता ‘१०० कोटी खान’ बनला आहे. सलमान खानला आता एका सिनेमासाठी १०० कोटी रुपये ऑफर करण्यात आले आहेत. नुकत्याच रिलीज झालेल्या एक था टायगर सिनेमाने केळ ५ दिवसात १०० कोटी रुपयांचा आकडा पार केला. १०० कोटीहून जास्त रुपये कमावणारी ही सलमान खानची चौथी फिल्म होती.

लागोपाठ एवढ्या सिनेमांना बॉक्स ऑफिसवर १०० कोटी कमावून दिल्यामुळे सलमान खान बॉक्स ऑफिसचा बादशाह बनला आहे. त्यामुळेच त्याची मागणीही वाढली आहे. आता सलमान खानला एका सिनेमासाठी १०० कोटी रुपयांचीच ऑफर आली आहे. सलमान खानने अजूनही हा चित्रपट साईन केलेला नाही. मात्र लवकरच ही ऑफर सलमान खान स्वीकारेल.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार निर्माते रमेश तौरानी यांनी सलमान खानला ही ऑफर दिली आहे. एक था टायगर सिनेमाने कमी दिवसांत १०० कोटी रुपये कमावून नवा विक्रम नोंदवला आहे. त्यामुळे सलमानच्या घराबाहेर वाट्टेल ती किंमत देऊन सलमानला सिनेमात घेण्यासाठी निर्मात्यांची रांग लागली आहे. तौरानींनी दिलेली ऑफर ही सर्वाधिक आहे. एवढे पैसे घेतल्यास सलमान खान भारतीय सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन मिळवणारा अभिनेता ठरेल. भारतीय सिनेमात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या रजनीकांत यांनाही सलमान खान मागे टाकेल.

First Published: Friday, August 24, 2012, 16:14


comments powered by Disqus