Last Updated: Friday, August 30, 2013, 16:44
www.24taas.com, झी मीडीयी, मुंबई बॉलिवूड अभिनेता सलमान खान होस्ट करणाऱ्या ‘बिग बॉस-७’ या शोच्या प्रमोशनसाठी सलमान जोरदार सराव करीत आहे. तसेच तो रियालिटी शो ‘झलक दिखला जा’मध्ये दिसणार आहे. ‘झलक दिखला जा’च्या मंचावर त्याने खूप धम्माल तर केलीच पण धक-धक गर्लसोबत ठुमके लगावले आहेत. चक्क माधुरीने सल्लूला नाचवलं.
‘झलक दिखला जा’ च्या मंचावर सलमानने जरा हटके एंट्री केली आहे. तो बिग बॉसच्या खुर्चीवर बसलेला आहे आणि एका बाजुला स्वर्ग अप्सरा उभ्या आहेत तर दुसऱ्या बाजुला डायना उभी आहे. ‘झलक दिखला जा’ च्या मंचावर सलमानने खूप मस्ती केली आहे. आणि माधुरीसोबत ठेका धरला. माधुरीच नाही तर करण जॉहर, रेनो डिसूजासोबत त्याने डान्स केला.
सलमानने सर्व सहभागी कलाकारांसोबतदेखील खूप धम्माल केली. याआधी सलमान ‘एक था टायगर’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये येऊन गेला आहे. त्यामुळे सलमान झलक दिखला जाच्या मंचावर दुसऱ्यांदा आला आहे. सलमानचा बिग बॉस हा शो पुढच्या महिन्यात येणार आहे. या आधी बिग बॉसचे ६ सिझन होऊन गेले आहेत.
आतापर्यत या शोसाठी सलमान खान, अमिताभ बच्चन, संजय दत्त, शिल्पा शेट्टीला होस्ट केले आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Friday, August 30, 2013, 15:23