मिथूच्या इशाऱ्यावर नाचणार दबंग खान, Salman dance with mithu on dance india dance super moms

मिथूच्या इशाऱ्यावर नाचणार दबंग खान!

मिथूच्या इशाऱ्यावर नाचणार दबंग खान!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

रिअॅलिटी शो ‘डान्स इंडिया डान्स- सुपर मॉम्स’ची विजेती ठरलेली मिथू चक्रवर्ती आता तिच्या स्वप्नाच्या जवळ पोहोचली असल्याचं तिला वाटतं. मिथूला सुपरस्टार सलमान खानसाठी कोरियोग्राफ करायचंय.

कोलकत्ता इथं राहणारी, शास्त्रीय नृत्य क्लास चालवणारी मिथू ३४ वर्षाची असून तिला दोन मुलं आहेत. ‘डान्स इंडिया डान्स- सुपर मॉम्स’ या रिअॅलिटी शोची विजेती ठरल्यानं ती आता फार आनंदात आहे.

मिथूला आपलं स्वप्न पूर्ण करायचयं. हा शो ती जिंकेल असा विश्वास तिला नव्हता. पण हा शो जिंकल्यानं ती तिचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे, असं तिनं सांगितलंय. तिला आपल्या आयुष्यात एकदा तरी आपल्या आवडत्या चाहत्यासोबत डान्स कोरियाग्राफ करायचा होता आणि आता ती हा शो जिंकल्यानंतर ती आपल्या स्वप्नाच्या जास्त जवळ गेली आहे. आता खूप मेहनत घेऊन लवकरात लवकर दबंग खान सलमानला आपल्या तालावर नाचवण्यासाठी मिथू उत्सुक आहे.

एक गृहिणी असूनही तिनं या शोमध्ये सहभाग मिळवला. तरी देखील घरातून तिला कधी काहीही अडचणी आल्या नाहीत. तिच्या पतीनं तिला आधार दिल्यानं ती या ठिकाणी पोहोचली आहे, असं मिथूनं सांगितलयं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.



* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, September 9, 2013, 18:10


comments powered by Disqus