… आणि सलमानचा चेहरा लालबुंद झाला!, salman get red again

… आणि सलमानचा चेहरा लालबुंद झाला!

… आणि सलमानचा चेहरा लालबुंद झाला!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सलमान पुन्हा एकदा भडकला... कुणावर?? असा काहिसा विचार तुमच्या मनात आला असेल ना! पण, नाही यावेळी तो कुणावरच भडकलेला नाही (हे विशेष) तर अलर्जीमुळे त्याचा चेहरा लालेलाल झाला.

‘बिग बॉस’ या कार्यक्रमाच्या शूटींग दरम्यान सलमानच्या चेहऱ्यावर मेकअप लावला गेला. या मेकअपमुळे त्याला अॅलर्जी झाली. तसं पाहिलं तर मेकअप करणं सलमान टाळतोच पण जर केलाच तरी तो चांगल्या प्रोडक्टसचा वापर करतो. तरिही त्याचा चेहरा या मेकअपमुळे खराब झाला. त्याच्या संपूर्ण चेहऱ्यावर लाल डाग उमटले.

सगळ्यांना आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे, यावरून सलमान चिडला नाही की कुणावर रागावलाही नाही. परंतु, सलमानच्या अॅलर्जीमुळे जवळपास ३० मिनिटं शूटींग थांबवण्यात आलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, July 25, 2013, 12:55


comments powered by Disqus