दिलदार सलमानकडून लेखकाला महागडी वस्तू भेट!,Salman gift a costly watch to dialogue writer

दिलदार सलमानकडून लेखकाला महागडी वस्तू भेट!

दिलदार सलमानकडून लेखकाला महागडी वस्तू भेट!
www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई

सलमान खानचा दिलदार स्वभाव तर सगळ्यांनाच माहित आहे. त्यानं यावेळी चक्क स्वत:च घडयाळ भेट म्हणून दिलंय. सलमानचा आगामी चित्रपट `किक`चा डायलॉग रायटर रजत अरोराला त्यानं आपल्या हातातलं घडयाळ भेट केलंय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, सलमानला किक चित्रपटासाठी रजतचं काम खूप आवडलं. चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्यावर रजतला त्याच्या कामासाठी काहीतरी भेट दयायला हवी, असं सलमानला वाटलं. तेव्हा त्यानं आपल्या हातातलं घडयाळ काढून दयाला भेट दिली.

एवढंच नव्हे तर सलमाननं फिल्मी दुनियेत आणि आपल्या जवळच्या माणसांमध्ये ही रजत आणि त्याच्या कामाची प्रशंसा करत आहेत. यापूर्वी ही सल्लूने काही मित्रांना कशी महागडी वस्तू भेट म्हणून दिली आहेत.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, June 14, 2014, 17:28


comments powered by Disqus