अस्वस्थ सलमाननं आरोपीच्या पिंजऱ्यात ऐकली साक्ष Salman hit-and-run case: Actor arrives in court, witn

अस्वस्थ सलमाननं आरोपीच्या पिंजऱ्यात ऐकली साक्ष

अस्वस्थ सलमाननं आरोपीच्या पिंजऱ्यात ऐकली साक्ष
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सलमान खान ‘हिट अँड रन’ केसमध्ये आज या प्रकरणातील जखमी आणि प्रत्यक्षदर्शींची साक्ष झाली यावेळी मोहम्मद कलीम शेख, मुन्नू खान आणि मुस्लिम शेख या तीन जखमी आणि प्रत्यक्षदर्शींची साक्ष घेण्यात येतेय.

यापैकी मुस्लिम शेख यांची साक्ष न्यायालयात झाली असून, मुस्लिम शेखनं सलमानला ओळखलं आहे. या सुनावणीला सलमान खान हा न्यायालयात आला असून, या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. आता साक्षीदारांची उलटतपासणी सुरु आहे. गेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं सलमान खानला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते.

पाहूयात सलमान खान हिट अँड रन केलं मधील ज़ख़्मी आणि प्रत्यक्षदर्शी मुस्लिम शेखनं मुंबई सेशन्स कोर्टात का़य साक्ष दिली.

 मुस्लिम शेख – प्रत्यक्षदर्शी - वय २६ वर्षे

- मी तेव्हा ए१ बेकरीत काम करत होतो

- अब्दुल,समील,मुन्ना हे माझ्या सोबत कामला होते

- ही घटना रात्री साधारण २.४५ वाजता झाली

- आम्ही फुटपाथवर झोपलो असताना अचानक मोठा आवाज़ झाला

- मला जाग आली तेव्हा मी गाड़ी ख़ाली होतो

- एक गाडी माझ्या पायावरुन गेली होती, लोकं आम्हाला मदत करायला धावले

- एक मोठी गाड़ी होती, त्या गाडीतून सलमान खान आणि पोलीस वाला होता. तो गाडी बाहेर आला तेव्हा त्याला लोकांनी पकडलं

- गाडी खाली अब्दुल, मुन्नु खान आणि मी होतो

- मला नंतर दवाखान्यात नेण्यात आलं

- तो आरोपींच्या बॉक्समध्ये बसलाय तोच सलमान त्यानंच आमच्यावर रात्री गाडी चढवली


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, May 6, 2014, 14:14


comments powered by Disqus