सलमान- शाहरुख `पक्के शेजारी`! Salman Khan – Shah Rukh Khan all set to become neighbours?

सलमान- शाहरुख `पक्के शेजारी`!

सलमान- शाहरुख `पक्के शेजारी`!
www.24taas.com, मुंबई

सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यातील दुश्मनी जगजाहीर आहे. पण आता सलमान खान शाहरुखच्या जवळ जाणार आहे. मनाने नाही... तर सलमान खान शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्याशेजारच्याच इमारतीत घर घेत आहे.

सलमान गेली अनेक वर्षं आपल्या परिवारासह गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहातो. १ बीएचके असणारं हे घर सलमान खानला लहान वाटत आहे. त्यामुळे त्याने आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत मोठं घर घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी सलमान ‘सागर रेशम’ या इमारतीमध्ये एक घर विकत घेण्याच्या विचारात आहे. या घराची किंमत १०० कोटी रुपये इतकी असल्याचं सांगितलं जात आहे. मुख्य म्हणजे हे घर शाहरुखच्या मन्नत या बंगल्याशेजारीच आहे.

सागर रेशम इमारतीतील हे घर सध्या एका गुजराती कुटुंबाच्या मालकीचं आहे. या इमारतीतून समुद्राचटं विहंगम दृश्य दिसतं. हे घर खरेदी करण्याच्या उद्देशाने सलमानने अनेकवेळ या घराला भेट दिल्याचं सांगितलं जात आहे. हे घर विकत घेतल्यावर सलमान च्या घरासमोर समुद्र असेल आणि शेजारी शाहरुख खानचा बंगला...

First Published: Monday, April 8, 2013, 19:32


comments powered by Disqus