Last Updated: Monday, February 4, 2013, 09:39
www.24taas.com, मुंबई अभिनेता सलमान खानला आज जोधपूरच्या कोर्टात हजर रहावं लागणार आहे. सलमानबरोबरच अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम यांनाही कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत.
पंधरा वर्षांपूर्वी हम साथ साथ हैं या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी हरणांची शिकार केल्याचा आरोप या सर्वांवर ठेवण्यात आलाय. याप्रकरणी या सर्वांवर आरोप निश्चत करण्यात येणार आहेत.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुख्य मॅजिस्ट्रेटने वन्यजीव अधिनियमांतर्गत आरोप निश्चित केले होते. तसेच इतर कलाकारांवर विविध कलमांतर्गंत आरोप निश्चित केले होते.
First Published: Monday, February 4, 2013, 09:32