Last Updated: Saturday, February 16, 2013, 15:40
www.24taas.com, नवी दिल्ली धनाढ्यांच्या विवाह सोहळ्यात बॉलिवूडच्या तारे-तारकांची उपस्थिती... मंडपांचा डामडौल... आणि तिथल्या गंमती – जमती नवीन नाहीत. बॉलिवूडच्या स्टारचा एका ठुमक्यासाठी करोडो रुपये उधळले जाणं आणि विवाहाची रंगत वाढवणंही नवीन नाही.
एका वर्तमानपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, नुकतीच सलमान खानलाही एका विवाह सोहळ्यासाठी करोडो रुपयांची ऑफर मिळालीय... थांबा... थांबा... ही ऑफर त्यानं लग्न करावं म्हणून नाही बरं का! तर ही ऑफर आहे फक्त विवाहात थिरकण्यासाठी... आणि तीही थोडीथिडकी नाही तर तब्बल ३.५ कोटी रुपयांची...
याबाबत सलमानला छेडलं असता त्यानं मात्र काहीही सांगण्यास नकार दिला. सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच दिल्लीत हा विवाह सोहळा पार पडणार आहे. ज्यामध्ये बराचसा पैसा फक्त बॉलिवूड स्टारच्या डान्सवर उधळला जाणार गेलाय.
First Published: Saturday, February 16, 2013, 15:40