ऐश्वर्यासमोर... अभी-सल्लूचा दोस्ताना!, salman khan & abhishek bacchan together

ऐश्वर्यासमोर... अभी-सल्लूचा दोस्ताना!

ऐश्वर्यासमोर... अभी-सल्लूचा दोस्ताना!
www.24taas.com, मुंबई

सलमान खान आणि अभिषेक बच्चन... एकमेकांशी गप्पा मारताना... हे चित्रं जुळवताना तुम्हाला थोडा त्रास होतोय का? किंवा आश्चर्य वाटतंय का? पण, हो असं घडलंय. सूत्रांच्या माहितीनुसार, सलमान आणि अभिषेक बच्चन यांनी नुकताच काही वेळ एकमेकांसोबत घालवलाय.

सन्नी देवन यानं नुकतंच एका ख्रिसमस पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीसाठी या दोन्ही कलाकारांनाही आमंत्रण देण्यात आलं होतं. या पार्टीला हजर असणाऱ्या एका सूत्राच्या माहितीनुसार, सलमान या पार्टीला मध्यरात्री २.३० वाजता पोहचला. एव्हाना सलमानचा खुपच जवळचा मित्र साजिद नाडियादवाला हा पार्टीतून निघून गेला होता. यावेळी सलमाननं चक्क समोर असणाऱ्या अभिषेकच्या म्हणजेच आपल्या ‘एक्स गर्लंफ्रेंड’च्या नवऱ्याच्या गळ्यात हात टाकले आणि दोघांनी एका कोपऱ्यात जाऊन काही वेळ गप्पाही मारल्या. हा एवढं मात्र नक्की की यावेळी सलमाननं अगोदरपासूनच काही पेग रिचवलेले होते.

या साध्यासुध्या घटनेकडे आपसुकच अनेकांचं लक्ष वेधलं गेलं त्याचं कारणही तसंच होतं कारण ज्यावेळी या दोघांच्या गप्पा सुरू होत्या त्यावेळी ऐश्वर्याही या पार्टीमध्ये उपस्थित होती.

आहे की नाही तुम्हालाही चकीत करणारी घटना!

First Published: Wednesday, December 26, 2012, 16:37


comments powered by Disqus