Last Updated: Tuesday, May 7, 2013, 18:52
www.24taas.com, झी मीडिया, लंडनज्याच्या लग्नाची सर्वाधिक चिंता बॉलिवुडमध्ये आहे, आणि त्याचे चाहतेही अशी काही बातमी आली की त्या बातमीवर उड्यावर दुड्या टाकतात. त्याच अभिनेता सलमान खानची आता एक रोमानियन मैत्रिण असल्याची बाब समोरआली आहे. लुलीया वंतूर असे या मैत्रिणीचे नाव आहे.
लुलीया वंतूर रोमानियात टीव्ही अभिनेत्री आहे. सलमान खान तिच्यासोबत महत्त्वपूर्ण वेळ घालवताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांपासून दोघे एकमेकांना ओळखतात. काही वर्षांपूर्वी विदेश दौऱ्यावर असताना सलमान तिला भेटला होता. तो कायम तिच्या संपर्कात असतो. आता दोघांची घट्ट मैत्री झाली आहे. सलमानच्या निमंत्रणावर लुलीया भारत भेटीवरही आली होती. यावेळी दोघे बऱ्याच ठिकाणी फिरताना दिसले होते.
सलमानने आता लग्न करायला हवे, असे त्याचा मित्र आणि बॉलिवूड अभिनेता आमीर खाननेही म्हटले आहे.
First Published: Tuesday, May 7, 2013, 18:52