सलमानचे कोर्टातले पुरावे... दगाबाज रे! Salman Khan courts legal trouble once again

सलमानचे कोर्टातले पुरावे... दगाबाज रे!

सलमानचे कोर्टातले पुरावे... दगाबाज रे!
www.24taas.com, मुंबई

हिट अँन्ड रन प्रकरणी सलमान खान आणि मुंबई पोलिसांना कोर्टानं समन्स बजावलाय. सामाजिक कार्यकर्त्या आभा सिंग यांनी याप्रकरणी पोलिसांविरोधातही याचिका दाखल केली होती.

सलमान खानला वाचवण्यासाठी पोलिसांनी चुकीचे पुरावे सादर केले असा आरोप त्यांनी याचिकेत केला होता. त्यावर कोर्टानं सलमान खान आणि मुंबई पोलिसांना समन्स बजावलंय.

गेल्याच महिन्यात हिट अँड रन केस प्रकरणी अभिनेता सलमान खानला मुंबई पोलीस मदत करत आहेत, असा गंभीर आरोप माजी आयपीएस अधिकारी वाय पी सिंग यांनी केला होता. कोर्टानं आदेश देऊनही सलमान खान 82 वेळा कोर्टात गैरहजर राहिला. पण पोलीस सलमान खानला अभय देत आहेत असा आरोप सिंग यांनी केला होता.

First Published: Monday, December 3, 2012, 17:34


comments powered by Disqus