सलमानची पुन्हा `कर` दबंगगिरी, Salman Khan full of extra income tax

सलमानची `कर` दबंगगिरी

सलमानची `कर` दबंगगिरी
www.24taas.com, मुंबई

बॉलिवूडमध्ये सलमान खानची दबंगगिरी सुरूच असल्याचे दिसून येत आहे. मात्र, ही दबंगगिरी चांगल्या अर्थाची आहे. `दबंग`, `रेडी`, `बॉडीगार्ड` आणि `एक था टायगर` असे चित्रपट सुपरडुपर हिट ठरल्याने अभिनेता सलमान खान कर भरण्यामध्येही `टायगर` ठरला आहे. त्याने आठ कोटी रुपयांचा आगाऊ कर भरून अन्य कलाकारांवर मात केली आहे.

सल्लूने गतवर्षी सप्टेंबर तिमाहीत पाच कोटी रुपयांचा आगाऊ कर भरला होता. आता त्यांने आठ कोटी रुपये आगावू कर भरला. त्यामुळे बॉलिवूडमध्ये सलमानची चलती असल्याचे दिसत आहे. टायगरने बॉक्सऑफिसवर १९८ कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते.

कतरिना कैफने अभिनेत्रींमध्ये कर भरण्यात बाजी मारली आहे. तिने दोन कोटी साठ लाख रुपयांचा कर भरला आहे. गेल्या वर्षी तिने एक कोटी सत्तर लाख रुपयांचा कर भरला होता. सलमान खानचा प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या शाहरुख खानने या वर्षी पाच कोटी रुपयांचा आगाऊ कर भरला आहे. अक्षयकुमारचे नाव अजून "हाऊसफुल्ल`च्या स्पर्धेत असल्याने त्यानेही साडेसात कोटी रुपयांचा कर भरला आहे.

सध्या चर्चेत असलेली जोडी आणि लग्नाच्या बेडीत अडणाऱ्या सैफ आणि करीना ही मागे नाही. सैफ अली खानने यंदा तीन कोटी रुपयांचा कर भरून आपणही कमी नाही हे सिद्ध केले आहे. करीना कपूरने दोन कोटी वीस लाख रुपयांचा कर भरला आहे. आमिर खानचा आगाऊ करभरणा मात्र यंदा कमी झाला आहे. गेल्या वर्षी त्याने साडेचार कोटी रुपयांचा कर भरला होता या वर्षी त्याने केवळ सव्वातीन कोटी रुपयांचा कर भरला आहे.

First Published: Wednesday, September 19, 2012, 11:31


comments powered by Disqus