Last Updated: Monday, May 19, 2014, 15:40
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईअभिनेता सलमान खानच्या हिट अँड रन केसमुळं अडचणी वाढण्याची शक्यताय. अभिनेता सलमान खानला चौथ्या साक्षीदारानंही कोर्टासमोर ओळखलंय.
हिट अँड रन केसमध्ये साक्षीदाराला धमकी देण्यावरील रिपोर्टही आज कोर्टात सादर केला गेला. मुंबई पोलीस हा रिपोर्ट आज सादर केला. घटनेतील साक्षीदार कोर्टात उपस्थित होते. मुंबई सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी चालू आहे.
अपघाताच्या दिवशी समलान खान ज्या हॉटेलमध्ये गेला होता, तिथल्या साक्षीदारानं त्याला ओळखलं. त्या दिवशी सलमान आमच्या हॉटेलात आला होता. त्यानं व्यवस्थापकाकडून दारू मागवली. परंतु, सलमान दारू प्यायला की नाही हे मी पाहिलं नाही, असं साक्षीदारानं सांगितलं. दरम्यान याप्रकरणाची सुनावणी उद्या म्हणजे 20 मे रोजी होणार आहे. त्यामुळं आता सलमानचं भविष्य काय हे कळेलच.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, May 19, 2014, 15:40