अभिनेता सलमानचा मुंबईत चक्क सायकवरून प्रवास, Salman Khan in Mumbai stroll from the bicycle.

अभिनेता सलमानचा मुंबईत चक्क सायकवरून प्रवास

अभिनेता सलमानचा मुंबईत चक्क सायकवरून प्रवास
www.24taas.com, झी मीडिया, पंढरपूर

११ वर्षांपूर्वीच्या हिट एंड रन प्रकरणी सलमान खानने चांगलाच धडा घेतलेला दिसून येत आहे. सलमान मुंबईत सध्या रात्रीचा फिरताना गाडीचा वापर न करता आता सायकलचा वापर करीत आहे. नरिमन पॉईंटवर त्याने चक्क सायकवरून प्रवास केला.

सलमान खानने आपल्या बॉडीगार्डच्या गराड्यात नरिमन पॉईंटवर प्रवास केला. यावेळी चाहत्यांना थोडावेळ काहीच समजले नाही. मात्र, सल्लू असल्याचे समजतातच त्याला पाहण्यासाठी गर्दी झाली खरी. तोपर्यंत सलमान सायकलने पुढे निघून गेला.

हिट एंड रन प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या वांद्रे कोर्टाच्या निर्णयाविरोधात सलमाननं सेशन कोर्टात अपील केलं होतं. आपल्याला सदोष मनुष्यवधाच्या आरोपांतून आपल्याला मुक्त करण्यात यावं, असं अपील सलमान खानने केलं होतं. मात्र हे अपील फेटाळून लावल्यामुळे सलमान खानच्या अडचणींत वाढ झाली.

२८ सप्टेंबर २००२ रोजी सलमानच्या कारनं धडक दिल्यानं एकाचा मृत्यू आणि ५ कामगार जखमी झाले होते. या प्रकरणी सलमान खानवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदावण्यात आला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, November 13, 2013, 11:37


comments powered by Disqus