दबंग हिरो शूटिंगच्यादरम्यान जखमी, salman khan injured during film shooting

'दबंग' हिरो शूटिंगदरम्यान जखमी

'दबंग' हिरो शूटिंगदरम्यान जखमी
www.24taas.com,झी मीडिया,नवी दिल्ली

बॉलीवूडचा दबंग हिरो सलमान खान चांगलाच दुखापतग्रस्त झालाय. आपलं घरचंच प्रोडक्शन असणाऱ्या 'मेंटल' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याला दुखापत झालीय.

'मेंटल' या चित्रपटाचे शूटिंग सध्या हैदराबादमधील रामोजी राव सिटीमध्ये चालू आहे आणि गेल्या कित्येक दिवसांपासून सलमान या चित्रपटाची शूटींग पूर्ण करण्यात व्यस्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी सलमानच्या डाव्या पायाला इजा झाल्याने तो जखमी झालाय. याआधी मार्चमध्येही चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याच्या हाताला इजा झाली होती.

'स्टॅलिन' या तेलगू चित्रपटाचा रिमेक म्हणजे 'मेंटल'... या चित्रपटात सलमान व्यतिरिक्त डेझी शाहदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ज्युनिअर कलाकारांनी केलेल्या संपामुळे दोन महिने मेंटल याचित्रपटाचे शूटिंग स्थगित करण्यात आलं होतं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, July 16, 2013, 11:31


comments powered by Disqus