Last Updated: Monday, August 20, 2012, 21:42
www.24taas.com, मुंबईअभिनेता सलमान खाननं आपल्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. रमजान ईदनिमित्त मुंबईतल्या वांद्रे इथल्या घराबाहेर येऊन आपल्या चाहत्यांना त्यानं शुभेच्छा दिल्या.
सलमानचा एक था टायगर हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळवत असल्यानं सलमानच्या घरी आज ईदचा खास उत्साह आहे.
सलग ३ वर्ष सलमानचे ईदला प्रदर्शित होणारे चित्रपट हिट ठरले आहेत. दबंग आणि बॉडिगार्ड या ईदला प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळं यावेळची ईदही सलमानला शुभदायक ठरली आहे.
First Published: Monday, August 20, 2012, 21:42