आता सलमानही फेसबूकवर..., salman khan on facebook

आता सलमानही फेसबूकवर...

आता सलमानही फेसबूकवर...
www.24taas.com, मुंबई
शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्यानंतर ‘बिइंग ह्युमन’ सलमान खानही आता फेसबूकवर प्रकट झालाय. ऑक्टोबर महिन्यात सलमान खानची ‘बिईंग ह्युमन’ची काही चेन स्टोअर्स सुरु होणारं आहेत. याबद्दलची एक बातमीही सलमान खाननं फेसबूकच्या माध्यमातून त्याच्या तमाम चाहत्यांना दिलीय.

सलमान खानचं हे फेसबूक पेज आज शुक्रवारी म्हणजेच आज सकाळपासून प्रदर्शित करण्यात आलं आणि अल्पावधीतच म्हणजे दुपारपर्यंत या पेजनं २.६ लाखांपेक्षा जास्त ‘लाईक्स’ मिळवलेत. याच पेजवर सलमान खाननं एक व्हिडिओही प्रदर्शित केलाय. या व्हिडिओत सलमान म्हणतो, ‘अनेक लोकांनी मला सांगितलं की, फेसबूकवर तुझ्या नावाची अनेक खोटी पेजस आहेत, तू स्वत: कधी फेसबूक जॉईन करतोयस. तर... हे घ्या मीही या मंचावर आलोय’. याचवेळी सलमान खानची फेक पेजेस बनवणाऱ्यांसाठीही सलमाननं एक संदेश दिलाय. यात तो म्हणतोय की, ‘माझ्या नावाची जेवढी पण फेक पेजेस आहेत त्यांनीही या पेजला लाईक करावं, आणखी काय सांगू मी’.

यावेळी पुढच्या महिन्यात सलमानची ‘बिईंग ह्युमन’ची काही चेन स्टोअर्स सुरू होत आहेत. याबद्दलही सलमाननं आपल्या फॅन्सला माहिती दिलीय.

First Published: Friday, September 14, 2012, 16:52


comments powered by Disqus