पुन्हा प्रभूदेवा आणि सलमान खान एकत्र! Salman Khan-Prabhudheva to team up again?

पुन्हा प्रभूदेवा आणि सलमान खान एकत्र!

पुन्हा प्रभूदेवा आणि सलमान खान एकत्र!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

प्रभूदेवाने बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं, ते ‘वॉण्टेड’ या सिनेमाद्वारे. हा सिनेमा सुपरहिट होण्यामागे महत्वाची भूमिका होती सलमान खानची. आता पुन्हा सलमान आणि प्रभूदेवा एकत्र येत आहे.

सलमान खानने ‘वॉण्टेड’ नंतर सुपरहिट सिनेमांचा धडाका लावला. दबंग, रेडी, बॉडीगार्ड, एक था टायगर आणि दबंग २ असे एका मागोमाग एक सुपरहिट सिनेमे देण्याची सुरूवात वॉण्टेडनेच झाल्यामुळे आता प्रभूदेवा आणि सलमान खान यांच्या एकत्र येण्याने पुन्हा एक धमाकेदार सिनेमा बनण्याची शक्यता आहे.

हा सिनेमाही ऍक्शन फिल्म असेल. या सिनेमाची स्क्रीप्ट अजून पूर्ण झालेली नाही. मात्र हा सिनेमा सलमान खानच्या नेहमीच्या सिनेमांसारखाच असेल. हा सिनेमा लोकांना प्रचंड आवडेल, अशी प्रभूदेवाला अपेक्षा आहे. प्रभूदेवाचा नुकताच आलेला ‘रावडी राठोड’ सिनेमाही सुपरहिट झाला होता. आगामी ‘रमैय्या वस्तावैय्या’ हा सिनेमाही प्रभूदेवानेच दिग्दर्शित केला आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, June 16, 2013, 20:11


comments powered by Disqus